Saturday, 1 April 2017

सहजच

*सहजच*...

एक जीव जन्माआधी अस्वस्थसा होता..
पृथ्वीवरती जन्म घेण्या आतुरलेला होता..

पाहुन त्याची तळमळ चुळबुळ परमपिता प्रगटला
"इतक्यां लवकर जन्म घेण्याची घाई का रे तुला?"

लक्ष नव्हते जरी त्याचे, उत्तर दिले त्याने उगाचच
"ठाऊक नाही परंतु मजला ओढ लागली सहजच"

जन्म घेऊनी धरेवरती, रमला नाही तो कोणात, लोकात समाजात..
सतत असे तो मग्न पुस्तकात, निसर्गात आणि स्वत:त..

ध्यान साधना-ज्ञानसाधना नित्यक्रम  असे त्याचा
स्व:अर्पण समर्पण करत भाव जाणे आत्म्याचा

कल्पनेत ही जे कोणी लिहले नव्हते, जे थोड्यांनीच स्व: जाणीले होते
मातृकृपेने त्याने अनुभवले तत्क्षण
मग कळले त्यास जन्म अस्वस्थ कारण

जाणती सर्व तो आत्मा आपण
तरी सांगतो तुम्हा उगाचच
शब्द सुचले म्हणून लिहले सर्व
प्रेम प्रवाहित भाव "सहजच.."

सहज तत्क्षण सुचलेली..
निर्मल चरणी अर्पण.. 🌺🌸🌷🌼🌻🥀🌹💐

✍डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी 😇💞🌎

No comments:

Post a Comment