*विसर...*
कधी हे विसरतो
कधी ते विसरतो
बाकी सारे आठवते
महत्वाचे ते विसरतो
लवकर उठणे विसरतो
नव्याने जगणे विसरतो
पाहतो आरसा तरीही
स्व:ला भेटणे विसरतो
जगण्याची, कामाची घाई
आवश्यक काय ते विसरतो
कामाच्या ढिगाऱ्याखाली
माझे मीपण, कुटुंब विसरतो
क्षण मिळता थोडे निवांत,
भविष्याच्या कोशात विसवतो
थकुनी जेव्हा थांबतो श्वास
माझे अस्तित्व,प्रायोजन विसरतो
सहजच सुचलेली...
*पवित्र निर्मल चरणी अर्पण..* 💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹🌺
डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी😇🙏🌎💞
No comments:
Post a Comment