*वेळ..*
बाळा खरचं मला वेळ असता
तर मी तो तुला दिला असता..
मग तुझ्या मनात माझ्याबद्दल
इतका कधी राग उरला नसता..
सकाळी जर लवकर थोडा
अलार्म झाला असता,
तुला घेऊन सोबत माँनिग
फेरफटका केला असता..
ब्रेकफास्ट करत तुझ्या
सोबत थांबलो ही असतो
ट्रेन पकडण्यासाठी मग
मात्र मी चुकलो असतो..
आहे मोबाईल सोबत पण
तुझ्याशी गप्पा मारत नसतो
कारण बाॅस माझ्याकडेच
पूर्णतः लक्ष ठेऊन असतो
घरी येण्या रोज ठाऊक तुला
मला उशिरच किती व्हायचा
गोष्ट सांगुन कुशीत झोपवण्यास
कधी वेळच नाही उरायचा
शाळेत प्रत्येक पालक मिटींगला
मात्र न चुकता यायचो ना मी
तुझा बैंच कोणता आणि मित्र कोण
विचारायचे विसरूनच गेलो मी
बाळा खरचं मला वेळ असता
तर मी तो तुला दिला असता..
मग पुर्ण नाव सांगताना मध्यावर
... तुझा चेहरा पडला नसता..
सहज सुचलेली..
निर्मल चरणी अर्पण 💐😇💞🌎
✍डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी
पारिवारिक जीवन समुपदेशक 😇
No comments:
Post a Comment