Tuesday, 4 April 2017

मी

*मी...*

फुकाचाच आता शरीरी श्वास वाहे
अंतरी बाहेरी दाखवा, मी कुठे आहे

जरी दिसतो मी एक त्रिमिती आकार
त्यास क्षणिक व्याधी अनंत विकार

तरीही आत्मा अस्पर्शित शुध्द आहे
नित्य सहजतेने, चैतन्यात न्हात आहे

पकडण्यास असमर्थ, वारा मंद आहे
उधळीत आता मी, जगी सुगंध आहे

प्रकाश ही आता मज भेदून जाऊपाहे
त्यास ठावे आमचे अस्तित्व एक आहे

घड्याळ ही धावी करुनी संथ वेळ,
सुरु असे माझा,त्याचा अनंताचा खेळ

सहज सुचलेली..

डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी 😇🙏
*निर्मल चरणी अर्पण..*💞🌷🌸🌺💐🌹🌻

No comments:

Post a Comment