बोलावयास नव्हते जवळी कोणी माझ्या
स्वतःच स्वतःचा मित्र बनवावयास शिकलो,
शब्द आणि भाव फरक ओळखावयास शिकलो
आज मी पुन्हा नव्याने ऐकावयास शिकलो..
ओल्या पापण्यात विखुरली जरी दिव्य स्वप्ने,
तरी नव्याने त्यांस स्पर्शावयास शिकलो
तोडल्या मी भिंती कल्पनेतील क्षितिजाच्या
आज मी नव्याने स्वप्न जगावयास शिकलो
शाळेतही घरातही शब्दांची बाराखडीच होती
हृदयात भाव समुद्र.. ओठांवर मात्र कडीच होती
आता मी शब्दात भाव मिळावयास शिकलो
आज मी नव्याने चित्रशब्द रंगावयास शिकलो
चालताना न सापडता मज सोबत ही कुणाची
धावताना भीती रस्त्यात विखुरल्या खळग्यांची,
एकांतात हळुच पंख पसरावयास शिकलो..
बघता बघता उंच.. मी उडावयास शिकलो...
प्रत्येकाला वाटते मी काहितरी खास आहे..
माझ्या प्रयत्नां यशाची खात्री हमखास आहे
जगा पढत मूर्खांची उगा विखुरली रास आहे
उघड डोळे वेड्या "मेहनतीविना यश आभास आहे"
No comments:
Post a Comment