Saturday, 31 December 2016

ओळख

आधी खुप लिहायचीस,
छान कविता करायचीस..
लहर आली अचानक की,
कुंचल्यातून चित्र कोरायचीस..

उगाच आॅफीसला दांडी मारुन 
मैत्रिणी सोबत भटकायचीस..
गरम काॅफी तासभर थंडावत
गप्पांसोबत रिचवायचीस

आता तु काही लिहीत नाहीस..
निवांतही कधी दिसत नाहीस..
काम-घर,नवरा.. चार माणसे
यापलिकडे का जग असत नाही?

दिसतेस कधी ट्रेनबरोबर धावताना,
बाईकवरून नवऱ्यासोबत फिरताना
लग्नात उगाच दागिन्यांत मिरवताना
जुन्या मैत्रिणीं सोबत खोटे हसताना

अपडेट देतेस मुद्दामच सगळ्यांना
घर गाडी कुटुंब पैसे कित्येक कमवले
उदास  चेहरा न लपवता सांगतो मात्र
समाधान स्वतःपासुन स्वतः गमवले

गरज नसते व्यर्थखर्डेघाशी करण्याची
आवड नसता पैशात काम करण्याची
ज्या कामाने ह्दय पोट दोन्ही भरेल
हिम्मत धर ते शिवधनुष्य पेलण्याची

काही हसतील तुझ्या रिकाम्या खिशावर,
काही जळतील त्या स्वप्नील कुंचल्यावर..
धीर धर थोडासा नाराज न होता,
आयुष्य खुलु लागेल रंग बहरल्यावर

आता तुझा चेहरा हसरा आणिक तु
नित्य नवीन भासत आहेत
हजारात ही आता तुझी स्वः ओळख
दिमाखात उठुन दिसत आहे..

No comments:

Post a Comment