*भिंती...*
हल्ली सगळीकडेच भिंती असतात,
रस्त्यात, कामात, आणि.. विचारात,
उगाच तुम्हाला अडवतात.....
थांबवतात, कधी भांबवतात..
तुम्ही ही मागे वळता..
थोडी वाट बदलता,
कधी आतुन घाबरता
पटकन मागेच पळता
हळुच वळून बघता तेव्हा ,
वाट सरळ सोप्पी दिसते,
तुमच्याकडे ती ही डोळे
मिचकावत हसते..खुणावते.
फिरुन परत चाललात की पुन्हा,
भिंत अडवते, डरवते,आणि रडवते...
प्रवासात सुरुवातीला असतो
जोश, होश आणि तु मदहोश
अर्धा रस्ता ही नाही सरता,
पसरेल रोष, असंतोष, आक्रोश
पावला पावलावर गमतील
भ्रांति , भिंती.. किती भिती ...
परतीच्या ही सुटतील माती,
खोटी... गोती- नाती
हे तर व्हायचे..चढायचे,खाली पडायचे, रडायचे आणि मग
पडता, रडता,भिंत चढता-चढता आपण आतून घडायचे😇
*सहज सुचलेली कविता...*
*🙏डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी*😇
No comments:
Post a Comment