2016 वर्ष संपायला आले.. आणि सहजच स्वतःशीच संवाद साधला..
मन---" *कसे गेले हे वर्ष आणि आता या बाकी 4 दिवसात काही बाकी काम करता येईल का? आणि 2017 साठी काही संकल्प???*🤔
हदय-- *गेल्या 4 वर्षीय मेहनत या वर्षाच्या सुरवातीलाच माँ च्या कृपेने डॉक्टरेट संपादन झाली आणि तेही गोल्ड मेडल सकट*☺
मन-"खुप रिसर्च केला असशील ना..? "
हदय--"खरं सांगायचं तर ज्या विषयावर गेली 4 वर्ष मेहनत करत होतो.. त्याच्या विषय व्याप्ती मध्ये ऐनवेळी बदल करावा लागला.. म्हणजे खरा नवीन विषयावर प्रबंध या वर्षात तयार झाला आणि आधीचा प्रबंध नाकारणाऱ्या समितीने चक्क गोल्ड मेडल दिले आणि तेही प्रबंध विषयावर पुस्तक लिहण्याचा सल्ला देत... 😜स्पोटयानिटी कामात आली आणि समझले की.. *ठरवण्या पेक्षा ज्ञान प्रवाही होणे जास्त पसंत करते..*
मन -- "आता शिक्षण थांबवून जरा जास्त कमवायला लाग.."
हदय - - *यार मी या वर्षात अजुन दोन उच्च शिक्षणाच्या डिग्रीसाठी प्रवेश घेतला..*😊😇
मन--म्हणजे फक्त शिकत बसणार? आता 2016 मधल्या कमाईबददल सांग.. कमाई वाढली असेल ना???
हदय--" *माहित नाही.. कारण हिशोब ठेवत नाही पण 1800 विद्यार्थी पर्यंत व्याप्ती वाढली आणि देशाच्या बाहेरून ही कन्सल्टींग साठी फोन येऊ लागलेत.. या वर्षी 2 फोरेन डेलिगेशन येऊन भेटून गेले..*
मन -—"म्हणजे तुला असे म्हणायचे आहे का, की तु तुझे क्लाईंट नेटवर्क वाढवले आहेस? "
ह्दय –-" नाही रे.. *उलट मी जवळची अतिरिक्त माणसे कमी केली...खुपच कमी*, परंतु प्रभावशाली सृजन व्यक्तिच्या फक्त संपर्कात राहिलो... "
मन - - "आश्चर्य आहे.. म्हणजे तु टाईम मेनेज करतोयस का? "
"नाही... *एनर्जी मेनेज करतोय* .. वेळ बरोबर धावत बसण्यापेक्षा गरजेनुसार वेळेला किंमत देतोय..म्हणून काम करायला मजा येतेय आणि परिवारातील लोकांना ही भरपुर वेळ देता येतोय"
मन--2016 मध्ये काही सामाजिक बांधिलकी? Social contributions?
ह्दय - - "अरे हा.. या वर्षी 10+ प्रभावशाली लोक एकत्र जमवून मुलांच्या हितासाठी *सेव्हन फ्लावर फाऊंडेशन स्थापन*केली... त्यात बरेच प्रकल्प राबविण्यात आले... अजुन बरेच लोक स्वतः होऊन सामिल होत आहेत"
मन—-"मग या बाकी 4 दिवसात काय, नवीन वर्षाचे प्लॅनिंग ??? "
ह्दय - -" आताच एका सेमिनारचे काम सुरू आहे आणि लिखाण सुध्दा... नवीन वर्षांत एक कन्स्ट्रक्टीव्ह काम हातातुन घडण्याची तयारी सुरु आहे... आणि
खरचं सांगतो... *ठरवुन नाही काही करता येत... फक्त प्रवाहात बरोबर सत्व जपत वाहावे लागते*..
तुकाराम महाराज सांगतात की...
*आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां* ||१||
*मग तो कृपासिंधू निवारी सांकडें । येर तें बापुडे काय रंक* ||धृ||
*भयाचिये पोटि दुःखाचिया राशी । शरण देवासी जातां भले* ||३||
*तुका म्हणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्वंभर*||४||
No comments:
Post a Comment