Wednesday, 1 February 2017

वाघ

राखेतून ही जी येई पुन्हा उफाळून  अजुनही माझ्यात ती आग आहे
विझवू पाहे धमकावून मजला त्या
खोटेपणावर आताही राग आहे

आमिष फुकाचे न भुलवे क्षणभर
नीतीमत्तेची आतुनच जाग आहे
मौनात माझिया विश्वाची शक्ती तरी
सहन करणे स्वभावाचा भाग आहे

जबाबदारीच्या पिंजर्‍यात अडकून केला जरी स्वातंत्र्याचा त्याग आहे
डिचवू नका, अडवू नका कधी मला
भडकलो कधी,तर मात्र मी वाघ आहे

... सहजच सुचलेली..
डाँ.शैलेषकुमार सहजयोगी 😇🙏

No comments:

Post a Comment