Tuesday, 25 October 2016

कळतं की वळतं

खरच मला कळत नाही😳..
कि कळतं पण वळत नाही. 🤔
कामाचे तास संपले तरी
शरिर मात्र पळत राही. 🏃🏻

खरच मला कळत नाही😳..
कि कळतं पण वळत नाही. 🤔
विझली पणती दिवाळीची💥 ..
तरी मन जळत राही. 🔥

खरच मला कळत नाही😳.. कि कळतं पण वळत नाही. 🤔
कमवतो भरपूर दरमहा तरी💵 पैश्यासाठी धावपळत राही. 💸

खरच मला कळत नाही😳..
कि कळतं पण वळत नाही. 🤔
रोज हलका केला तरी😡
राग मनात तळमळत राही. 😤

आता मला कळलं आहे🙄.. आणि बदलायला मन वळलं आहे.😇.
उशिर झाला मात्र थोडा⌚.. श्वास थांबला 🤒 आणि शरिर  जळलं आहे... 💀

Don't get late to "REALIZE UR SELF"

Dr. Shailesh sahajayogi
Extract from sahaja parivartan book😇🙏😇

No comments:

Post a Comment