*रक्षाबंधन - *
खरं तर मला बहिण नाही... तात्पुरता नात्यात बांधून घेणे ही मला आवडत नाही... पण रक्षाबंधन आले कि रिकाम्या हात मनाला रिकामेपण देऊन जातो आणि मग इतरांशी कामासंबधात बोलत असताना... रस्त्यावर जात येत असताना मी इतरांच्या हातातील राख्या मोजत राहतो...
तुम्ही म्हणाल की का नाही बनवत कोणाला बहिण...
सरसकट सर्व माझ्या बहिणीच आहेत.. भीती फक्त हि वाटते.. तीला खरच गरज असताना मी तिथे असेन का?
कोणी तिला अरे केले किंवा तत्सम नजरेने तीला बघितले तर खरच मी त्याला जाब विचारेन का?
मी खरचं तिचा भाऊ (भीती घालवून ऊणीव भरणारा) बनण्याच्या लायक आहे का?
उत्तर मला ठाऊक आहे... आणि त्या हातभर राख्या बांधून मिरवणाऱ्या भावांनाही...
आणि खरं सांगायचं तर आजच्या स्त्रिया खरचं सक्षम आहेत... पुर्वी पासुनच त्या सक्षम होत्या... आम्ही त्याना बंधनात बांधत गेलो... भावनांच्या आणी घरातील चौकटीच्या...
म्हणुन तर रक्षाबंधन...
खरतर बहिण भावाला राखी बांधत असते
भावाच्या रक्षणासाठी ...
राखी बांधुन बहिन भावाला आपल्या प्रेमाच्या रक्षणात ठेवते आणि आम्ही मात्र आपला अहंकार जपत तिच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असेन असे क्षणिक आश्वासन देतो... आणि उगाच अपराधी नको वाटायला म्हणून गिफ्ट ही...
लेखन
डॉ. शैलेश कुमार सहजयोगी यांच्या
"परिवर्तित आयुष्य "या पुस्तकातून अशंत
No comments:
Post a Comment