Tuesday, 2 August 2016

Ashtavakra

*॥ जय श्री माताजी ॥*

*परमपूज्य गुरु श्री अष्टावक्र भगवान हे आदिगुरु श्री राजा जनकांचे गुरु होते. त्यांनी लिहिलेल्या अष्टावक्र गीता ह्या पवित्र ग्रंथातील कांही निवडक वचनें खाली दिली आहेत.*
१) मनुष्य जन्म हा ८४ लाख योनीतून होतो, पण तो मनुष्य झाल्यावर पुन्हा त्याच योनीत ढकलला जातो, त्याचे *कारण अहंकार आणि प्रतिअहंकार होय.*
२) *मनुष्यातील सत्य धर्म हा फक्त एक सद्गुरु जागृत करु शकतो,* (धर्मातीत) पार झालेल्या साधकामध्ये धर्माच मोजमाप अगदी स्वच्छ पाण्याप्रमाणे आहे *तो जे बोलतो आणि बोलण्यातून जसे घडते आणि तो जे ज्ञान देतो त्याचे रुपांतर धर्मात होते ही त्याची पहिली सिद्धी आहे.*
३) *मनुष्याला आजार हे दोन प्रकारांनी येतात १) मागील (पूर्व) कर्म २) अपेक्षा* त्यामुळेच इच्छेने लिप्त मनुष्य *ज्या अपेक्षा आणि इच्छा जगाच्या कल्याणासाठी नसतात ज्या इच्छा आणि विषयातून क्रोध, राग आणि भिती निर्माण होते असा मनुष्य स्वत:ला नर्काच्या दिशेला ढकलतो.*
४) *सुखाची अपेक्षा करणारा मनुष्य दुसर्‍यांच्या सुखातून परमेश्वराला दोष लावत असतो.*
५) *मायेतून पार झालेला साधक जरी स्वत:ला प्रकृति (आदिशक्ति) च्या श्री चरणी  लीन झालेला असेल तरी त्याची परिपक्व साधना महामायेच्या प्रभावाखाली आहे हे तो विसरतो.*
६) माझ्या शिष्या राजा जनक हा जरी परमेश्वराकडून आला असला तरी त्याला *मनुष्याप्रमाणे दु:ख आणि सुख ह्या गोष्टींना सामोरे जाणे आहे.* त्याच्या मुलीला अशा गोष्टींना सामोरे जावे लागणार की त्याची कल्पना स्वत: (माझा शिष्य) राजा जनक पण करु नाही शकणार, आणि ते बदलू पण शकणार नाही.
७) *योग, विद्या आणि सिद्धी ह्या सुद्धा मायेच्या प्रभावाखाली आहे म्हणून ह्या गोष्टी महामाया बोलवली जाते.*
८) हे माझ्या शिष्या नीट ऐक (राजा जनकांचे गुरु बोलले) *कुंडलिनी जागृती म्हणजे योग नाही, तिला (कुंडलिनीला) सहस्त्रारात स्थिर करणे म्हणजे योग आहे, आणि स्थिर करुन हे जग एका नाटकासारखे पहाणे हा महायोग आहे, हे तु जाणून घे आणि इतरांना पण सांग, कारण घोर कलीयुगात हे कार्य शिव आणि शक्ती (महामाया) स्वरुपात करणार आहे.*
९) हे माझ्या शिष्या (राजा जनक) मला साधक खूप मिळतील, गुरु पण खूप होतील, महागुरु पण हजार असतील पण *आत्मस्वरुप (विदेही) होऊन ह्या जगाला तारणारे गुरु मला हवे आहे आणि ते खूप कमी आहे. ते तुला शोधावे लागतील, म्हणून तू घोर कलीयुगा पर्यंत जन्म घेत रहा आणि त्यांचा शोध घेत रहा....*

No comments:

Post a Comment