Saturday, 26 March 2016

Medical seminar cabella

मेडिकल सेमिनार कबेला ( ईटली), ऑगष्ट २०११. मधील कांही प्रश्न उत्तरे....

१)      निर्विचार स्थिती प्राप्त करण्यास आडचण, विचार थांबतच नाहीत, काय करावे ?

: विचार नियंत्रीत करण्यासाठी – उजवे स्वाधिष्ठान बर्फ लावा,यकृत आणि अहंकार. दिवसातून दोन वेळा मीठपाणी. उजवी बाजू थंड करा त्यासाठी डावा हात अकाशा कडे व श्री हनुमनचालिसा म्हणा.जास्तच विचार आसतील तर भजनं आपल्याला ऐकू येतील इतपत गावीत.सहस्त्रारावर चित्त ठेऊन महत्तअहंकाराचा मंत्र घ्या.

२)     मुलांच्या समस्या  ?

: मुलांच्या स्वतःच्या अशा समस्या नसतात.पालकांच्यामुळेच त्यांना समस्या उत्पन्न होतात.शरिरांतर्गत जास्तीची उष्णता,अहंकार वैगेरे पालकाचे दोष मूलें शोशून घेतात व त्यांच्या अनाहत चक्रावर दबाव निर्माण करून त्यांची रोग प्रतिकारक शक्ती क्षीण करतात.पालकांनी वारंवार स्वतःचा क्लिअरंस करावा. मुलांना आहारात भरपूर खनिजे,व्हीट्यामिन्स व न्यूट्रयंट्स ध्यावेत.पूरक औषधी गोळ्या देउ नये.

३)     स्त्रीयांच्या समस्या ?

: स्त्रीया सततच कामात व्यग्र आसल्याने थकून जाउ शकतात. त्यांनी दररोज श्री देवीकवच वाचावे.डावा हात यक्रतावर ठेउन श्री गणेश अथर्वशिर्ष म्हणावे.पाळीचे सर्व दोष स्वधिष्ठानाच्या बिघाडाने होतात. श्री गणेश अथर्वशिर्ष दररोज म्हणावे उजवे स्वधिष्ठान यकृत व अहंकाराला बर्फ लावावा.

४)     थॉयराईडचा बिघाड  ?

: टिंगल टवाळी टाळा.विशूध्धीवर चित्त ठेउन श्री माताजींना प्रार्थना करा ,” आपल्या कृपेत मी शुद्ध आत्मा आहे,मला सर्व प्रतिकर्मा ( Reactions ) पासून दूर ठेवा.माझ्यातिल टिकेखोरपणा दूर करा.

५)    यकृतासाठी पथ्य ?

: मिरची,बटर,चीज, रेड मीट आजिबात नको. चिकन,भात आणी पपयी उत्क्रष्ट.

यकृताच्या समस्येसाठी श्री गणेश अथर्वशिर्ष म्हणत बर्फ लावणे, तसेच श्री चित्तदेवता, श्री हिमालय देवता मंत्र प्रत्योकी १६ वेळा.

६)     अशूद्ध ईच्छा कशी सोडून ध्यायची ?

  : प्रार्थना – प्रार्थना करा की प. पू. श्री माताजी कृपया मला शुद्ध ईच्छा प्रदान करा, माझी अशूद्ध ईच्छा नष्ट करा.उजवा हात डाव्या स्वाधिष्टान वर ठेउन महाकाली-भद्रकाली-काली-काली चा मंत्र सात वेळा घेणे.

७)    हाडांची समस्या ?

: हाडांच्या  समस्या ह्या नाभीचक्र बाधित झाल्याने निर्माण होतात.हे चक्र स्वच्छ करणे आवश्यक आहे.दररोज दोन ते तिन मीठ पाण्याचे सत्र करणे आवश्यक.प्रार्थना, “ हे आई तू विंध्यावासिनीच आहे,कृपया आपल्या कृपेत मला ठेव,”माझे नाभीचक्र ठिक होओ.१० वेळा.नेहमी स्वच्छ व ताजे आन्न गृहण करणे.

८)     फुफूस आणि घशाचा  कर्क रोग ?

: कर्क रोग हा डाव्या बाजुचा आजार आहे. नियमित मीठ पाणी १०८ श्री आदीगुरू दत्तत्र्ययांची नांवे घेत करणे.भवसागराची अगुरूंची पकड हेच कर्क रोगाचे मूळ आहे.यांच्याशी कोणत्याही मार्गाने कांहिही संबंध नको.डाव्या विशूद्धी मागे मेणबत्ती धरून तिन वेळा श्री विष्णूमाया मंत्र घ्यावा.नंतर श्री न लावता तीन वेळा मंत्रिका साक्षात मंत्र. त्या नंतर परत श्री न लावता सर्वमंत्र सिद्धी विभेदिनी तिन  वेळा.

९)     हातावर व्हायब्रेशनची जाणिव होत नाही ?

: विशुद्धीचक्र व तळहात यांना ऑलिव्ह ऑईल ची मसाज करणे ( आपल्या कडे तिळाचे तेल पण चालेल ). ध्याना पूर्वी खांध्यापासून हाताचे व्यायाम करणे व तळ हात तेल लाऊन चोळणे. एकानंतर एक हात कांही मिनिटे थंड पाण्यात बुडविणे.असे करतांना दुसरा हात श्री मातांजी कडे करणे आवश्यक, तिकडून चैतन्य घेण्या करिता.हे करत आसतांना श्री गणेश अथर्वशिर्ष म्हणावे.

  १० )  ताणतणावाच्या समस्या व मधूमेह आजार ?

      : या सर्व उजव्या बाजूच्या समस्या आहेत. विचारावर नियंत्रण आवश्यक.उजव्या बाजूचे उपचार               करतांना १०८ श्री शिवाचे नांवे घेणे.श्री रामरक्षा म्हणने.श्री हिमालय व श्री चंद्रमा मंत्र ६ वेळा. डावा हात अकाश  तत्वाकडेकरून श्री हनुमन चालिसा म्हणने.

१०)  चित्ताची शुद्धताकशी करावी ?

  : अशुद्ध चित्त हे उजव मूलाधार व संपूर्ण उजव्या बाजूची समस्या आहे.मिठ पाणी करतांना डाव्या पायाला गरम तर उजव्या पायाला थंड पाणि घेणे .यकृताला बर्फ लाउन श्री कर्तिकेयांची १०८ नाव घेणे.श्री माताजींना प्रार्थना  ,” श्री माताजी मझे चित्त आपल्या कृपेत शूद्ध होवो, तसच माझे उजवे मुलाधार आपल्या कृपेत स्वच्छ होव.

११)    कौटूंबीक भूत बाधा ?

:या मागील आज्ञाचक्रातूनच साफ केल्या जातात.प्रार्थना , “ श्री माताजी मी माझ्या कुटूंबातील सर्व समस्यांना माफ करतो.मी माझ्या कुटूंबाला सर्व चूकां साठी क्षमा करतो.कृपया आमच्या कुटूंबातील सर्व बाधा नष्ट होवोत.श्री माताजी जी आमच्या सर्व पूर्वजांना क्षमा करा.त्यानंतर हं मंत्र तिन वेळा.२१ वेळा श्री महागणेश मंत्र.सकाळचे कोवळे उन बॅक आज्ञेवर घेउन बसा.

१२)  रक्तातिल कोलेस्टाल वाढल्यास ?

: ही  उजव्या बजुचची समस्या आहे.उजव्या ्वाधिष्टणला बर्फ यकृत आणि अहंकार,          डावा हात अकाशाकडे करून श्री हनुमान चालिसा.श्री हनुमान उजवी कडील उषणता आटोक्यात ठेवतात.

१३ )  तावचे संबंधी समस्या ?

    : नभी चक्र धरल्यास हे उद्भवतात.डावी नाभी व भवसागर स्वच्छ करणे.डाव्या बाजुला कॅन्डलिंग .      गेरू व मध चाटण.गेरू शूद्ध करून घेणे. पावडर तव्यावर तापउन थोडा दुधाचा शिडकावा करणे.गोड   कमि,नित्य कोकम सरबत.

१३)  नैराष्य, अति उत्सुकता आणि ईन्सोमॉनिया ?

:डावी बाजू पकडल्याने हे सर्व होते. ईनसोम्निया मात्र उजव्या बाजूच्या आडथळ्यांमूळे होतो.१०८ नांव श्री महाकालींचे घेउन कॅन्डल ट्रिटमेंट डाव्या स्वाधिष्ठण चक्राला तसेच डाव्या आज्ञा चक्राला,२१ नांव श्री भैरवांची घेत घेत.झोपन्यापूर्वी श्री महाकाली

-          भद्रकाली – काली –काली मंत्र ११ वेळेस घेने.

१४) रोग प्रतिकारशक्ती कमी , हार्णिया  ?

:प्रतिकारशक्ती क्षीण असते व हार्णिया  हे डावी तसेच उजवी असे दोन्ही बाजुचे प्रॉब्लेम आहेत.तीन कॅंन्डलची ट्रिटमेंट तसेच उजवी बाजू संतुलनात आणने.

 १५ )  अॅलर्जी ?

     डाव्या नाभिचा हा दोष आहे. यकृताला आजिबातच बर्फ लावू नका कारण ते लिथारजिक झाल्यानेच   अॅलर्जी बोते.फक्त श्री हिमालया व श्री चंद्रमाचा मंत्र घ्या, श्री हनुमान चालिसा म्हणा.श्री माताजींना यकृताचा समतोल साधण्याची प्रार्थना करा.बॅक आज्ञेवर हात ठेउन ,” या देवी सर्व भूतेषू सृति रूपेन संस्थिता.....हा मंत्र घ्या.

१५)  मुलांबद्धल असुरक्षिततेची भावना ?

: दररोज सकाळी श्र देवीकवच व सायंकाळी श्री रामरक्षा म्हणा.

१६)   पाठदुखीमूळे ध्यानाला मांडी घालुन बसता येत नाही ?

: नियमीत मिठपाणी, दोन्ही हात नाभीच्या मागील बाजूस पाठीवर ठेउन प्रार्थना करा, “ प. पू .श्री माताजी आपणच साक्षात श्री भगवती आहात कृपया माझी पाठदूखी दूर करा” त्या नंतर श्री भगवतीचा मंत्र घेत संपूर्ण पाठीला मसाज करा.

१७ ) सततची डोके दुखी ( मयग्रेन ) आणि ईन्फेक्शन ?

 : भवसागरावरिल पकडीमूळे तसेच एकादशरूद्र पकडल्याने होते.१०८ नाव श्री आदिगुरूंची भवसागराला बंधन घालीत घालीत.डाव्या भवसागराला १० आदीगुरूंची नावे घेत कॅन्डलिंग करणे. त्या नंतर श्री एकादश रूद्रांचे ११ नांव घेणे.

जय श्री माताजी..

No comments:

Post a Comment