Friday, 20 October 2023
*मी लाॅकडाऊन, आणि... ती *
Monday, 1 July 2019
पाऊस पाणी
जोरदार पावसात तो भेटताच तिने रस्त्यावर हात हातात घेत म्हटले त्याला," होत राहते रे.. अरे मी आहेना सोबत तुझ्या.."
आणि तो दचकला.. कसे दिसले असेल तीला इतक्या पावसात ही त्याच्या डोळ्यात जमलेले पाणी..
Saturday, 31 December 2016
शरण
आई त्व चरणी आलो मी शरण..
अर्पुणी अंतःकरण, पुर्ण समर्पण
युग युंगतराचा थकवा प्रवास,
छळती मजला अनंत आभास..
जप तप करुनी दर्शनाची आस..
शरीरा दिधले कित्येक मी त्रास
जाणीले त्व आदिशक्ती अवतरण
चैतन्याने सहज आत्म परिवर्तन
पाहिले म्या डोळा माझिया मरण
साधकास बनविलेस योगीगुरुजन..
डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी
Wednesday, 17 August 2016
Raksha Bandhan
*रक्षाबंधन - *
खरं तर मला बहिण नाही... तात्पुरता नात्यात बांधून घेणे ही मला आवडत नाही... पण रक्षाबंधन आले कि रिकाम्या हात मनाला रिकामेपण देऊन जातो आणि मग इतरांशी कामासंबधात बोलत असताना... रस्त्यावर जात येत असताना मी इतरांच्या हातातील राख्या मोजत राहतो...
तुम्ही म्हणाल की का नाही बनवत कोणाला बहिण...
सरसकट सर्व माझ्या बहिणीच आहेत.. भीती फक्त हि वाटते.. तीला खरच गरज असताना मी तिथे असेन का?
कोणी तिला अरे केले किंवा तत्सम नजरेने तीला बघितले तर खरच मी त्याला जाब विचारेन का?
मी खरचं तिचा भाऊ (भीती घालवून ऊणीव भरणारा) बनण्याच्या लायक आहे का?
उत्तर मला ठाऊक आहे... आणि त्या हातभर राख्या बांधून मिरवणाऱ्या भावांनाही...
आणि खरं सांगायचं तर आजच्या स्त्रिया खरचं सक्षम आहेत... पुर्वी पासुनच त्या सक्षम होत्या... आम्ही त्याना बंधनात बांधत गेलो... भावनांच्या आणी घरातील चौकटीच्या...
म्हणुन तर रक्षाबंधन...
खरतर बहिण भावाला राखी बांधत असते
भावाच्या रक्षणासाठी ...
राखी बांधुन बहिन भावाला आपल्या प्रेमाच्या रक्षणात ठेवते आणि आम्ही मात्र आपला अहंकार जपत तिच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असेन असे क्षणिक आश्वासन देतो... आणि उगाच अपराधी नको वाटायला म्हणून गिफ्ट ही...
लेखन
डॉ. शैलेश कुमार सहजयोगी यांच्या
"परिवर्तित आयुष्य "या पुस्तकातून अशंत
Tuesday, 5 April 2016
पंख
लोक विचित्र वागतात... ज्याचा अभिमान असावा.. त्याची लाज वाटुन घेतात... आणि ज्या गोष्टीची लाज वाटावी. त्यालाच जास्त महत्व देतात.
चिंतनाने मन माझे का असे हे बहरले...
चरणी तुझीया ठाव माझा.. मी स्वतःला विसरले...
आत मी नाही.. बाहेर ही..श्वास आत्मात मिसळले...
बंध न उरला जीवाचा, आसमंती मी पंख पसरले... 🙏
डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी लिखित
"सहज परिवर्तन 360° पुस्तकातील अंश भाग "