*मी राखी बांधुन घेत नाही..*
रस्ता वरुण फिरताना दिसतील आज असंख्य हात,
राखींनी भरलेले..
वेगवेगळ्या कलाकृतीच्या राखींनी हातावर प्रेमाची साक्ष द्यायला उगाच गजबजलेले..
मला सख्खी बहीण नाही,
याची खरचं कधी खंत नाही..
प्रत्येकजणी भाऊ समजतात यातच भरून येतं सर्व काही..
राख्या येतातं दूरदूरहून पत्रांनी, शुभेच्छांनी भरलेल्या..
पाठवतात दरवेळी ओळखीच्या आणि अनोळखी ठरलेल्या..
देवापुढे ठेऊनी ती राखी, मी पुन्हा त्यांच्यासाठी प्रार्थना करतो..
जमत नाही भेटायला पण मदतीचा हात नक्कीच देतो..
पाहीलेत मी ते ही हात, जे राखी बहीणीच्या उपयोगी पडत नाही,
स्वतःच्या बहीणीवरही उगारून हात, इतरांच्या बेअब्रू करत राही.
कधी शिव्या बहीणीच्या नावाने, तर कधी आईबापाचे घेतात नाव,
ते कसे असतील राखी लायक
आणि कसे मानावे त्यांना भाव.
मला राखी बांधताना भीती वाटते की धागा तर हातात बांधून घेईन,
जर नाही निभाऊ शकलो ही जवावबदारी,
तर भाऊ कसा म्हणवून घेईन.
हदयात भाव नसताना, हातात घालून, एक दिवस भाव खात मिरवत नाही.
कुणी कितीही नावे ठेवलीत तरी, जवाबदारी पार पाडल्याशिवाय, *मी राखी बांधून घेत नाही*.
✍️ डॉ शैलेषकुमार सहजयोगी लिखित...
😊 *रक्षाबंधन* शब्दात *रक्षा* शब्द आधी येतो.. *बंधन*.. नंतर
No comments:
Post a Comment