Saturday, 5 August 2017

मैत्री

*मैत्री*
मैत्री म्हणजे तू सोबत असलीस..नसलीस तरी.. नेहमी तू जाणवत राहणे..
तू समोर असूनही मुद्दामून पाहत नसलीस..  तरी तूलाच पाहत राहणे..

हजारांच्या गर्दीत मी स्वतः हरवलो तरी तूला शोधत राहणे..
आणि मग तू दिसली की..
मुद्दामून नजर चोरत निघून जाणे

मैत्री म्हणजे घोळक्यात तुझ्या बाजूला मुद्दामून उभे राहणे..
आणि तुझ्या नजरेने टोकले मला
तर नजर मिचकावत हसत राहणे

मैत्री म्हणजे तुझ्या कामासाठी वेळ काढून धावत पळत राहणे
तूला जाणवले नाही प्रेम कधी तर मैत्रीगीत तुझ्यासोबत गुणगुणत राहणे

सहज सुचलेली..
डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी..

No comments:

Post a Comment