उगा मी आॅनलाईन असतो.. जेव्हा कोणीच जागे असत नाही
सारखा मोबाईल पाहत बसतो
जरी कोणी काॅलच करत नाही
व्हाटसअप मध्ये मी नवीन असतो
रोज तेच स्टेटस/डीपी ठेवत नाही
कोणी पाहिले आणि कितीदा, याचा मीच नित् हिशोब ठेवत राही
नात्यात कमी, फोटोत लाईक असतो,
कोणी तोंडावर कौतुक करत नाही.
आपल्यांपासून तोंड लपवण्यासाठी,
मी ही पळण्याचा सबवे सर्फर खेळू पाही
हल्ली मी पाहतो स्वतःलाच सेल्फीवर
आरशात आणि डोळ्यात मी मावत नाही
आनंदाचे क्षण अनुभवून घेण्याआधी
तो फेसबूक वर अपलोड करण्याची घाई..
बोलतो सर्व एकमेकांशी मैत्रीने, प्रेमाची तहान मात्र भागत नाही..
म्हणूनच आम्ही आॅनलाईन असतो..
जेव्हा कोणीच जागे असत नाही
... *सहज मध्यरात्री सुचलेली..*
लिखित.. डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी*😇
No comments:
Post a Comment