Friday, 20 October 2023

मी राखी बांधुन घेत नाही..

*मी राखी बांधुन घेत नाही..*

रस्ता वरुण फिरताना दिसतील आज असंख्य हात, 
राखींनी भरलेले..
वेगवेगळ्या कलाकृतीच्या राखींनी हातावर प्रेमाची साक्ष द्यायला उगाच गजबजलेले..

मला सख्खी बहीण नाही, 
याची खरचं कधी खंत नाही.. 
प्रत्येकजणी भाऊ समजतात यातच भरून येतं सर्व काही..

राख्या येतातं दूरदूरहून पत्रांनी, शुभेच्छांनी भरलेल्या..
पाठवतात दरवेळी ओळखीच्या आणि अनोळखी ठरलेल्या..

देवापुढे ठेऊनी ती राखी, मी पुन्हा त्यांच्यासाठी प्रार्थना करतो..
जमत नाही भेटायला पण मदतीचा हात नक्कीच देतो..

पाहीलेत मी ते ही हात, जे राखी बहीणीच्या उपयोगी पडत नाही,
स्वतःच्या बहीणीवरही उगारून हात, इतरांच्या बेअब्रू करत राही.

कधी शिव्या बहीणीच्या नावाने, तर कधी आईबापाचे घेतात नाव, 
ते कसे असतील राखी लायक
आणि कसे मानावे त्यांना भाव. 

मला राखी बांधताना भीती वाटते की धागा तर हातात बांधून घेईन,
जर नाही निभाऊ शकलो ही जवावबदारी,
तर भाऊ कसा म्हणवून घेईन.

हदयात भाव नसताना, हातात घालून, एक दिवस भाव खात मिरवत नाही.
कुणी कितीही नावे ठेवलीत तरी, जवाबदारी पार पाडल्याशिवाय, *मी राखी बांधून घेत नाही*.

✍️ डॉ शैलेषकुमार सहजयोगी लिखित... 
😊 *रक्षाबंधन* शब्दात *रक्षा* शब्द आधी येतो.. *बंधन*.. नंतर

*मी लाॅकडाऊन, आणि... ती *

*मी लाॅकडाऊन, आणि... ती *
 
लाॅकडाऊन मध्ये आपण घराबाहेर पडत नाही..
जगामध्ये चालू घडामोडी, तीच्या आयुष्यात जास्त काही नाही.

मी झगडत असेन आयुष्याच्या प्रश्नांशी,
तीचा रोज दिवसच धडपड करत राही.

मी थांबू शकतो आरामासाठी सबबी काही, 
तीचा क्षण न क्षण कामात ओथंबून राही.

ती वैतागते, ती रागावते कधी रडून सुद्धा पाही. 
मी ढिम्म फक्त शब्दांत सांत्वनाच देत राही. 

मित्रा, लाॅकडाऊन आपल्याला जगाला, 
तीला तर तो रोजच्या सारखाच दिवस नाही? 

✍️डॉ शैलेषकुमार सहजयोगी,
सहज सुचलेली.. हदयातून उतरलेली💞

बिल गेट्स


🙇 बिल गेट्स ने एक स्कूल में भाषण के दौरान 10 बातें बताई जो विद्यार्थियों को नहीं सिखाई जाती

नियम १ – जीवन उतार-चढ़ाव से भरा है इसकी आदत बना लो.
नियम २ – लोग तुम्हारे स्वाभिमान की परवाह नहीं करते इसलिए पहले खुद को साबित करके दिखाओ.
नियम ३ – कॉलेज की पढ़ाई पूरी करने के बाद 5 आंकड़े वाली पगार की मत सोचो, एक रात में कोई वाइस प्रेसिडेंट नहीं बनता. इसके लिए अपार मेहनत पड़ती है.
नियम ४ – अभी आपको अपने शिक्षक सख्त और डरावने लगते होंगे क्योंकि अभी तक आपके जीवन में बॉस नामक प्राणी से पाला नहीं पड़ा.
नियम ५ – तुम्हारी गलती सिर्फ तुम्हारी है तुम्हारी पराजय सिर्फ तुम्हारी है किसी को दोष मत दो इस गलती से सीखो और आगे बढ़ो.
नियम ६ – तुम्हारे माता पिता तुम्हारे जन्म से पहले इतने निरस और ऊबाऊ नही थे जितना तुम्हें अभी लग रहा है तुम्हारे पालन पोषण करने में उन्होंने इतना कष्ट उठाया कि उनका स्वभाव बदल गया.
नियम ७ – सांत्वना पुरस्कार सिर्फ स्कूल में देखने मिलता है. कुछ स्कूलों में तो पास होने तक परीक्षा दी जा सकती है लेकिन बाहर की दुनिया के नियम अलग हैं वहां हारने वाले को मौका नहीं मिलता.
नियम ८ – जीवन के स्कूल में कक्षाएं और वर्ग नहीं होते और वहां महीने भर की छुट्टी नहीं मिलती. आपको सिखाने के लिए कोई समय नहीं देता. यह सब आपको खुद करना होता है.
नियम ९ – tv का जीवन सही नहीं होता और जीवन tv के सीरियल नहीं होते. सही जीवन में आराम नहीं होता सिर्फ काम और सिर्फ काम होता है .
नियम १० – लगातार पढ़ाई करने वाले और कड़ी मेहनत करने वाले अपने मित्रों को कभी मत चिढ़ाओ. एक समय ऐसा आएगा कि तुम्हें उसके नीचे काम करना पड़ेगा.

"विश्वास " किसी पर इतना करो कि वो तुम्हे फंसाते समय खुद को दोषी समझें........
" प्रेम " किसी से इतना करो कि उसके मन में तुम्हें खोने का डर बना रहे.।

Monday, 22 June 2020

डोळे आणि... ओठ

कधी कधी तिच्या ओठांवर ओठ ठेऊन द्यावे,
ती लाजलेली पाहून,आपण ही डोळे मिटून घ्यावे. 

Sunday, 10 May 2020

5 hidden secrets of Great Parenting today

*पाच लपलेली रहस्ये जी तुम्हाला आजच सर्वोत्कृष्ट पालक बनवतील*

"याची काळजी करू नका की तुमची मुलं कधी कधी तुमचं ऐकत नाहीत,
याची काळजी करा की ते नेहमीच तुम्हाला पाहत आहेत" - प्रसिद्ध अमेरिकन लेखक रॉबर्ट फलघुम

आपण सगळेच आपल्या कुटुंबीयांसाठी काम करत असतो, आपल्या घरातील गरजांपेक्षा, जबाबदार्‍यापेक्षा, आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी जास्त मेहनत घेत असतो.

आत्तापर्यंत आपण आपल्या कुटुंबीयांसोबत चांगला वेळ देता येण्याची वाट पाहत होतो, परंतु गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लाॅकडाऊन मध्ये घरी असताना आपल्याला आता कळत नाही आहे की आपण या वेळेत कशा प्रकारे आपले संबंध मुलांबरोबर संवर्धित करू शकतो?
हे जबरदस्तीचे घरात राहण्याची लाॅक डाऊन नात्यात कदाचित अजून कडूपणा तर निर्माण करत नाही ना?

कारण आपल्याला क्वालिटी टाईम म्हणजे मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाणे किंवा त्याच्या सोबत क्रिकेटसम मैदानी खेळ खेळणे असंच काहीतरी ठाऊक असते.

मला तुम्हाला सांगायची आहेत ती रहस्यं जी जगात खूपच कमी लोकांना माहिती आहेत, जसे की ती जाणून बुजून लपवली गेली असावीत.

मला कल्पना आहे की तुम्ही सर्वजण चांगले पालक आहात. तुम्ही नेहमीच आपल्या पालकत्वाची भूमिका उत्तमरित्या पार पाडता. आपण सर्व आपल्या मुलांवर खूप प्रेम करतो आणि आपली मुलंही आपल्यावर तितकेच प्रेम करतात, पण ह्या नातातील गोडवा, हे प्रेम संबंध  नेहमीच तसे राहतील ना ही अनिश्चितता आपल्या सर्वांच्या मनात राहते.
आपल्या कामाचा थकवा, भविष्याची चिंता, करीअरची असुरक्षितता हे आपल्यातच नाहीतर नात्यातही तणाव निर्माण करतात. या सर्वात मुलांचे *ऑल टाईम फेवरेट* बनण्याची इच्छा आपल्यात सुप्तावस्थेत जात राहते.

आपल्या सगळ्यांना एक उत्कृष्ट पालक व्हायचं असतं. आपल्या मुलांच्या नजरेत हिरो बनायच असतं.
परंतु कधी वेळ नसतो तर कधी काय आणि कसं करायला हवं हे माहीतच नसतं आणि आपल्याच मुलांसाठी आपण परके होऊन  जातो.

मी *डॉक्टर शैलेशकुमार सहजयोगी, पर्सनॅलिटी बिहेवियर एक्सपर्ट आणि पॅरेंटीग  ट्रान्सफॉर्मेशन कोच* गेल्या दहा वर्षापासून या क्षेत्रात संशोधन करत आहे आणि मला सापडली ती रहस्य, जी तुम्हाला आजच सर्वोत्कृष्ट पालक बनवतील.

नक्की कोणती गुपिते आपल्या मुलांना बोलायला प्रवृत्त करतात की *माय पेरेंट्स इस ऑसम* जाणण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा आणि तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल.

कोणतीही गोष्ट तुम्हाला चांगले पालक बनण्यासाठी तयार करत नाही.
 तुमची सहनशक्ती, तुमची बुद्धिमत्ता, तुमच्या भावना आणि कित्येक वेळा तुमच्या विवेकबुद्धीची ही परीक्षा असते.

सुरुवातीला आपण फक्त एकच चिंतेत असतो की लहान मुलांना सांभाळायचे कसे परंतु काही वर्षाने माहिती पडते, या समस्या काहीच नव्हत्या आणि मुलांच्या वाढत्या वयाने प्रश्नपण वाढत जातात आणि त्यासोबत जबाबदारीही.

गोष्ट हि आहे कि *पालकत्वाची जबाबदारी ही आयुष्यभराची जबाबदारी असते, तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यभराची..*

 नशीब आहे की यात आनंदही आहे आणि आपल्या मुलांना मोठे होत असताना, नावलौकिक मिळवत असताना पाहण्याचे सौभाग्यपण..

पुष्कळ वेळा आपण आयुष्यातील, व्यवसायातील बहुतांशी निर्णय मुलांच्या हिशोबाने घेत असतो जसे की या मेट्रो शहरात मुलांना शिक्षणाच्या व विकासाच्या खूप छान संधी आहेत म्हणून मेट्रोपॉलिटन शहरात स्थायिक होणे, आपले काम वाढवणे, नोकरी करणे इत्यादी.

सगळ्यात प्रथम सर्वोत्कृष्ट पालक बनण्यात मुख्य अडचणी काय आणि कोणत्या ता पाहू.

1. आपण नेहमी आदर्श पालक बनू इच्छितो.
2.आपल्याला नेहमीच वाटतं, मुलांनी आपले ऐकावे
3.आपल्या मुलांनी नियमाने शिस्तीने वागावे,स्वच्छतेने राहावे.
आणि अजून बरेच काही.. 

 आपण त्यांना आपल्याला हवे तसे आणि चार लोकांना आवडेल असे बनवण्याचा प्रयत्न दररोज न चुकता करत असतो.

पण *सर्वोत्कृष्ट पालक बनण्याची रहस्य काही वेगळेच सांगतात.*

तुमच्यापैकी किती जणांना आवडेल ही रहस्ये जाणून घ्यायला?

 तर तुमचे पूर्ण लक्ष इकडे द्या.

*रहस्य क्रमांक 1*
निश्चित रहा कोणी आदर्श नसतो.

स्वतःचे वागणे हल्के-फुल्के ठेवा. समस्या सोडवत असताना लक्ष फक्त समस्येवर असू दे, विशेषतः मुलांवर समस्येचा प्रभाव पडू देऊ नका. *मुलांना या गोष्टीसाठी कृतज्ञ होऊ दे की त्यांचे पालक आदर्श नव्हते परंतु सर्वोत्कृष्ट नक्कीच होते*

 *रहस्य क्रमांक दोन*
 प्रत्येक गोष्ट ऐकणे व करणे आवश्यक नाही.
(कितीही उपयोगी आणि गरजेचे असले तरी). 
मुलांशी बोलणे नाही, तर संवाद साधणे महत्त्वाचे असते.
मुलांनी तुमची प्रत्येक गोष्ट  ऐकली नाही, त्याप्रमाणे वागले नाहीत तरी खरच मोठा फरक पडत नाही.

तुम्ही मात्र तुमचा अहंकार न दुखवता विचार करा, कि *खूप वर्षे आधी तुम्ही तुमच्या आई वडिलांनी जे सांगितलं होतं, ती प्रत्येक गोष्ट ऐकली होती का? केली होती का?*

*तिसरे रहस्य*
 जवळजवळ प्रत्येक नियम कधीकधी तोडता येतो..
(हो प्रत्येक नियम.. ).

आपल्याला माहित असतं की मुलांना जंक फूड देऊ नये, त्यांना रात्री उशिरा जाग ठेवू नये,
डोळे फाडून जवळून टीव्ही पाहू देऊ नये, कधीही उलटे बोलणे किंवा शिवीगाळ करू देऊ नये.

आपण हे ही समजतो की *योग्य कारण असेल तर नियम तोडता येतात*.
मुलांना ह्या गोष्टीची जाणीव करून देता येऊ शकते की नियम तोडल्यास वाईटात वाईट काय होईल.
छोटे-छोटे नियम घालून आपण मुलांना बांधायला बघतो,
*छोट्या नाही मोठ्या नियमावलीत असे त्यांचे लक्ष केंद्रित करा*
 छोटे नियम ते स्वतः शिकतील, अगदी तुम्ही शिकवले नाहीत तरीही..

*रहस्य क्रमांक चार*
 प्रेम पुरेसे नाही, त्यांना पाहून आनंदी व्हा.
त्यांच्या सोबत असताना, ते तुमच्या कडे पाहत असताना, नेहमी खुश आनंदी दिसा. एक छानसे स्मितहास्य करा.
(कितीही तणावपूर्ण क्षण असेल किंवा कितीही दुःख पूर्ण दिवस असेल तरीही)..
तुमच्या चिंता, तुमची संकटे, अडचणी तुमच्यापर्यंतच ठेवा.

*मुलांसोबत आनंद मिळवण्याचे रहस्य हे आहे की, त्यांच्यावरच ध्यान केंद्रित करा असे की तेच तुमचे एकमात्र ध्येय आहे*

 *शेवटचे रहस्य क्रमांक पाच* मला सापडलेले पाचवे महत्वाचे रहस्य.. मुलांना स्वतःच्या गोष्टी स्वतःच् त्यांच्या पद्धतीने शिकू द्या.

फक्त लक्ष द्या की त्यांना कोणती प्रेरणा उपयोगी पडते, तुम्ही मुलांना सर्व शिकवण्यापेक्षा, ज्या गोष्टीत ते पारंगत आहेत, उत्तम आहेत, त्यात त्यांना सर्वोत्कृष्ट बनवण्यात मदत करा.

प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी मुलांतील प्रकृती शोधा आणि त्याना स्वतःहून उत्कृष्ट बनण्यास प्रवृत्त करा.

(तुमची भीती आणि असुरक्षितता तुमच्या जवळच राहू दे.)

*त्यांच्या आयुष्याच्या डिझायनिंग वर नाही, तर प्रोग्रामिंग वर लक्ष केंद्रित करा*

 सोपं आहे ना.. जाताजाता एक अजून गुपित सांगू..
*मुलांसमोर कधीच आपला संयम सोडू नका, वैतागू नका आणि धमकी तर अजिबात देऊ नका.*
जर  तुमची चुकी असेल तर सरळ लगेच माफी मागा.

 मुलांमध्ये आणि तुमच्या मध्ये ज्या समान गोष्टी आहेत त्या शोधा, त्यांना त्याची जाणीव करून द्या. त्याचा अभिमान बाळगा.
*फळाला अभिमान असतो झाडाचा*

 पुन्हा एकदा ही 5 रहस्य -
एक - निश्चिंत रहा,
दोन - प्रत्येक गोष्ट आवश्यक नाही.
तीन- जवळजवळ प्रत्येक नियम कधी कधी तोडता येतो.
चार- प्रेम पुरेसे नाही, तर आनंद महत्त्वाचा आणि
 पाच - मुलांना स्वतः त्यांच्या गोष्टी शिकू द्या.

हे सोपे परंतु खूप प्रभावशाली रहस्य जर आपण आपल्या मुलांसाठी वापरली तर आपण सर्वोत्कृष्ट पालक बनायला आजपासूनच सुरुवात करू शकू.

तुमच्याजवळ जर काही सर्वोत्कृष्ट पालकत्वाची रहस्य असतील तर मला ती ऐकायला, शिकायला नक्कीच आवडतील.
तुम्हालाही ही रहस्य आयुष्यात वापरताना जर काही प्रश्न आले किंवा तुम्हाला तुमचा अनुभव आम्हाला सांगायचा असेल, तर तुम्ही आम्हाला
*Care@betterchild.in* वर ईमेल करा.
वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही 8286 769 257 वर कॉल किंवा व्हाट्सअप* करू शकता.

तुम्हालाही पालकत्वाची तुमची रहस्ये वापरताना जे अनुभव आले, त्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

तुम्हाला हि माहिती आवडली असेलच.
मग लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारात ही गोष्ट शेअर करा, फारवर्ड करा.

*तुम्ही स्वतः बद्दल आज जे  बोलत आहात, काही वर्षानंतर तुमच्या मुलांना त्यांच्या कानात या शब्दांचे प्रतिध्वनी ऐकू येतील* - डॉ. शैलेषकुमार 

 पुढील भागात लवकरच आपण बोलू *ह्या रहस्यांना आयुष्यात वापरण्याच्या सोप्या पद्धती बद्दल आणि जगातील सर्वोत्कृष्ट पालकांनी शेअर केलेल्या नवीन रहस्यांबद्दल..

*सर्वोत्कृष्ट जगा आणि सर्वोत्कृष्ट करून बघा*

 ✍️ *डॉक्टर शैलेशकुमार सहजयोगी, पर्सनॅलिटी बिहेवियर एक्सपर्ट आणि पॅरेंटीग  ट्रान्सफॉर्मेशन कोच*, ..या लेखाचे सर्व हक्क स्वाधीन...
*www.Betterchild.in*Care@betterchild.in
📱 *8286769257*

Monday, 1 July 2019

पाऊस पाणी

जोरदार पावसात तो भेटताच तिने रस्त्यावर हात हातात घेत म्हटले त्याला," होत राहते रे.. अरे मी आहेना सोबत तुझ्या.."


आणि तो दचकला.. कसे दिसले असेल तीला इतक्या पावसात ही त्याच्या डोळ्यात जमलेले पाणी..

*आधुनिक पालकत्व*

*आधुनिक पालकत्व*

सध्याचे युग मोबाइल आणि नॅनो टेक्नॉलॉजीचे आहे.उच्च शिक्षण, नोकरी या करियरच्या शर्यतीत लग्न उशिरा करत पालकत्वाची जवाबदारी स्विकारायला वयाची पस्तीशी सहजच गाठली जाते.

उशीरा साशंक होऊन स्विकारलेले  नॅनो फॅमिलीतले पालकत्व मनामध्ये एक अनामिक न्युनगंड निर्माण करते. घरातील मोठय़ा वयोवृद्ध व्यक्तीपासून असलेला दुरावा आणि चाळीशीकडे झुकणारे आपण पालक साशंक होत आपल्या पाल्याला लवकर मोठे बनवू पाहतो, ज्याप्रमाणे एखाद्या फळाला कृत्रिमरीत्या प्रक्रिया करून पिकवले जाते.

पण या चुकीच्या एकांगी पालकत्व पद्धतीपेक्षा आपण  पाल्याचा सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यायला हवे. त्याने पालकांचे समाधान होऊन कोणत्याही प्रकारचा वेगळा तणाव  निर्माण होणार नाही.

पालकांनी अपेक्षेच्या गर्तेत व मुलांना स्पर्धेच्या तणावात गुंतवण्यापेक्षा आपापसातील मतभेद कसे दूर करता येतील  आणि प्रत्येकाचे स्वातंत्र जपत स्व:विकास कसा साधता येईल याकडे लक्ष द्यायला हवे.

आई वडिल एकत्र राहत असताना किंवा वेगळे झाल्यावर दोन विभिन्न प्रकारे आपले मुले घडवू पाहतात. आपापसात असलेली पाल्य घडवण्यातील मत भिन्नता मुलांच्या मनात दुरावा निर्माण करणार नाही आणि मुले एकत्रित किंवा वेगळे झालेल्या आई वडीलांना समजून घेतील अशाप्रकारे आपापसात संवाद आणि संबध साधणे आवश्यक आहे. आणि मुले मग त्याच्या परिणाम म्हणून आई वडिलांच्या मताला समान आदर देतील.

आईवडिलांच्या मतात दुविधा असलेली मुले पालकांशी संवाद गमावतात.जर पालकांनी एकांगी निर्णय न घेता घरातील सर्वाना निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेतले तर त्याचीच नक्कल करत मुले प्रत्येक गोष्ट घरातील सामुहिक निर्णयाने करण्याचा प्रयत्न करतील.  मग पालकांचा सल्ला किंवा सहभाग मुलांना स्व-स्वातंत्र्यावर हल्लाबोल वाटणार नाही, आणी मग  मुले मुद्दामच पालकांच्या विरोधात वागू  लागणार नाहीत.

दुरावलेल्या मुलांना जवळचे वाटू लागतात त्यांच्यासारखे बंडखोर मित्रमैत्रिणी. प्रत्येक सल्ला ते आपल्या मित्रमैत्रिणींना विचारून घेऊ लागतात. एक अनुभवशुन्य  दुसर्या अनअनुभवीला
चुकीचाच सल्ला देणार आणि त्यातून पुढे घडत जाते अगणित चुकांची साखळी..परंतु जर योग्य पालकत्व असेल आणि घरातील परस्पर वातावरण एकमेकांना पुरक असेल तर मुले त्यांचे प्रश्न अडचणी पालकांसोबत शेअर करतील आणि पालक त्यांना समजून घेत योग्य मदत,मार्गदर्शन करू शकतील.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मुलांना पालकांच्या मदतीची गरज राहतेच, म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की पालकांनी मुलांना त्यांच्या नशिबावर किंवा होईल नंतर सर्व ठीक म्हणत आपली पालकत्वाची जवाबदारी झटकू नये. पालक म्हणून आपला सहभाग मुलांसाठी नेहमीच  महत्वाचा आहे कधी प्रत्यक्षपणे आणि पुष्कळदा अप्रत्यक्षपणे.

मी एक पारिवारिक समुपदेशक असल्याने पुढील भागात आधुनिक पालकत्वाच्या अनुभवी टिप्स देण्याचा प्रयत्न करेन, ज्या आपल्या सर्वाना नक्कीच उपयोगी पडतील..

🖊डॉ. शैलेषकुमार सहजयोगी,
(Dr.sc. - Gold Medalist) Child Behavior Therapist,
Family Relationship Counsellor
Mob - 8286769257