Monday, 1 July 2019

पाऊस पाणी

जोरदार पावसात तो भेटताच तिने रस्त्यावर हात हातात घेत म्हटले त्याला," होत राहते रे.. अरे मी आहेना सोबत तुझ्या.."


आणि तो दचकला.. कसे दिसले असेल तीला इतक्या पावसात ही त्याच्या डोळ्यात जमलेले पाणी..

*आधुनिक पालकत्व*

*आधुनिक पालकत्व*

सध्याचे युग मोबाइल आणि नॅनो टेक्नॉलॉजीचे आहे.उच्च शिक्षण, नोकरी या करियरच्या शर्यतीत लग्न उशिरा करत पालकत्वाची जवाबदारी स्विकारायला वयाची पस्तीशी सहजच गाठली जाते.

उशीरा साशंक होऊन स्विकारलेले  नॅनो फॅमिलीतले पालकत्व मनामध्ये एक अनामिक न्युनगंड निर्माण करते. घरातील मोठय़ा वयोवृद्ध व्यक्तीपासून असलेला दुरावा आणि चाळीशीकडे झुकणारे आपण पालक साशंक होत आपल्या पाल्याला लवकर मोठे बनवू पाहतो, ज्याप्रमाणे एखाद्या फळाला कृत्रिमरीत्या प्रक्रिया करून पिकवले जाते.

पण या चुकीच्या एकांगी पालकत्व पद्धतीपेक्षा आपण  पाल्याचा सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यायला हवे. त्याने पालकांचे समाधान होऊन कोणत्याही प्रकारचा वेगळा तणाव  निर्माण होणार नाही.

पालकांनी अपेक्षेच्या गर्तेत व मुलांना स्पर्धेच्या तणावात गुंतवण्यापेक्षा आपापसातील मतभेद कसे दूर करता येतील  आणि प्रत्येकाचे स्वातंत्र जपत स्व:विकास कसा साधता येईल याकडे लक्ष द्यायला हवे.

आई वडिल एकत्र राहत असताना किंवा वेगळे झाल्यावर दोन विभिन्न प्रकारे आपले मुले घडवू पाहतात. आपापसात असलेली पाल्य घडवण्यातील मत भिन्नता मुलांच्या मनात दुरावा निर्माण करणार नाही आणि मुले एकत्रित किंवा वेगळे झालेल्या आई वडीलांना समजून घेतील अशाप्रकारे आपापसात संवाद आणि संबध साधणे आवश्यक आहे. आणि मुले मग त्याच्या परिणाम म्हणून आई वडिलांच्या मताला समान आदर देतील.

आईवडिलांच्या मतात दुविधा असलेली मुले पालकांशी संवाद गमावतात.जर पालकांनी एकांगी निर्णय न घेता घरातील सर्वाना निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेतले तर त्याचीच नक्कल करत मुले प्रत्येक गोष्ट घरातील सामुहिक निर्णयाने करण्याचा प्रयत्न करतील.  मग पालकांचा सल्ला किंवा सहभाग मुलांना स्व-स्वातंत्र्यावर हल्लाबोल वाटणार नाही, आणी मग  मुले मुद्दामच पालकांच्या विरोधात वागू  लागणार नाहीत.

दुरावलेल्या मुलांना जवळचे वाटू लागतात त्यांच्यासारखे बंडखोर मित्रमैत्रिणी. प्रत्येक सल्ला ते आपल्या मित्रमैत्रिणींना विचारून घेऊ लागतात. एक अनुभवशुन्य  दुसर्या अनअनुभवीला
चुकीचाच सल्ला देणार आणि त्यातून पुढे घडत जाते अगणित चुकांची साखळी..परंतु जर योग्य पालकत्व असेल आणि घरातील परस्पर वातावरण एकमेकांना पुरक असेल तर मुले त्यांचे प्रश्न अडचणी पालकांसोबत शेअर करतील आणि पालक त्यांना समजून घेत योग्य मदत,मार्गदर्शन करू शकतील.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मुलांना पालकांच्या मदतीची गरज राहतेच, म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की पालकांनी मुलांना त्यांच्या नशिबावर किंवा होईल नंतर सर्व ठीक म्हणत आपली पालकत्वाची जवाबदारी झटकू नये. पालक म्हणून आपला सहभाग मुलांसाठी नेहमीच  महत्वाचा आहे कधी प्रत्यक्षपणे आणि पुष्कळदा अप्रत्यक्षपणे.

मी एक पारिवारिक समुपदेशक असल्याने पुढील भागात आधुनिक पालकत्वाच्या अनुभवी टिप्स देण्याचा प्रयत्न करेन, ज्या आपल्या सर्वाना नक्कीच उपयोगी पडतील..

🖊डॉ. शैलेषकुमार सहजयोगी,
(Dr.sc. - Gold Medalist) Child Behavior Therapist,
Family Relationship Counsellor
Mob - 8286769257