मी जाण्याआधी पुन्हा एकदा
मागे नक्कीच वळून पाहीन,
मग कळेल मलाच उरेन पुरुनी,
की नुसताच देही जळून जाईन..
माझ्या कर्तृत्ववाचा आठवेल नंतर इतका काही मोठा इतिहास नाही,
पण जन्मा येऊन स्वत:साठी संपलो, इतका छोटा मात्र आभास नाही...
रोज नवीन चैतन्य भरले छातीत, उगा फुकाचा घेतला कधी श्वास नाही..
सतत नाविन्य कमवताना मुठीत रोखण्याचा केला कधी प्रयास नाही..
नाही बदलू शकत ते गेले आयुष्य
सर्व ठीक करण्याचा प्रयत्न ही नाही..
माझ्या सोबत आले होते सर्व, संपून जाईल माझ्यासोबत सर्व काही..
✍सहज सुचलेली
डॉ.शैलेषकुमार सहजयोगी 😇🧘♂🌀🧘♀