Thursday, 10 December 2015

आजचा दिवस

नमस्कार.. आजचा दिवस चैतन्यमय आहे... आज सकाळी चार वाजता ब्रह्ममुहुरत वर श्री माताजीनी ध्यान करुन घेतले... नंतर परत झोप.. अजून शिकायचे आहे कमी झोपेत आटपायला..

नंतर 7 वाजता उठून अभ्यास.. दहा वाजेपर्यंत...

आज घश्याचा आवाज बसलाय.. म्हणजे कामांना सुट्टी..

दुपारी शुध्दायला शाळेत घेऊन जात असताना तो नेहमी प्रमाणे धावत जाऊन गायब झाला... त्याला शोधत होतो.. तितक्यात एका स्त्रीने फोन करून शुध्दाय तीला सापडल्याचे मला सांगितले... तीचे आणि श्री माताजीचे आभार..

नंतर ग्राहकांना फोन.. खरंच या सेवा क्षेत्रात अजब गजब ग्राहक पहायला मिळतात... शब्द न पाळनारे..

आज अप्रतिम पुस्तक वाचले... द अलकेमिस्ट.. एका अशा भटक्या व्यक्तीची कहाणी ज्या लाआयुष्याच्या प्रवासात स्वप्न पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी एक अलौकिक व्यक्ती मदत करते.. जी त्या भटक्या व्यक्तीला आयुष्याच्या पाऊलवाटी उलगडून दाखविते..

द अलकेमिस्ट या शब्दाचा अर्थ किमयागार... कोणत्याही गोष्टीला वा वस्तूला परिवर्तित करत शुध्द स्वरूपात नेणारा..

श्री माताजी खरच अलकेमिस्टआहेत... एक किमयागार.. ज्यांनी आम्हाला सुद्धा किमया साधायला शिकवले...सहजतेने सर्वां सोबत प्रेमाने परिवर्तित होत शुद्धते कडे जाण्याचा मार्ग..

नंतर परत अभ्यास.. परंतु या वेळी पूर्ण थेसिसचे स्वरूप बदलून टाकले.. .ते ही सहजतेने परिवर्तित करत अजून शुद्धते कडे...

खूप दिवसांनी आज सहज 360 ग्रुप मध्ये नवीन सेशन लिहले... शब्द माझे.. ज्ञान श्री माताजीचे

आता काही स्पेशल जेवण म्हणजे घरी वेज बर्गर बनवले... थोडा बदल..

टिव्ही वर आवडते कार्यक्रम पाहिले आणि आवडती नवीन रिंगटोन मोबाईल मधे भरली...

उद्या नवीन दिवस.. नवीन घटना.. नवीन अनुभव.. आणि नवीन पुस्तक... नवीन आयुष्य जगण्याची साठी...

शुभ रात्री